18 January 2025 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा
x

IMA'चं मोदींना पत्र | देशात ८७००० वैद्यकीय कर्मचार्‍यांंना कोरोना तर ५७३ जणांंचा मृत्यु

Indian Medical Association, PM Narendra Modi, Healthcare workers, Covid 19

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यात नियंत्रणात असलेली देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला असून, कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.

दरम्यान, दिवसागणिक हेल्थकेअर कर्मचार्‍यांंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण होत आहे. प्राप्त माहितीनुसार आजवर देशात 87 हजार वैद्यकीय कर्मचार्‍यांंना कोरोनाची लागण झाली आहे तर दुर्दैवाने 573 जणांंचा कर्तव्य पार पाडताना मृत्यु झाला आहे. याच पार्श्वभुमीवर सर्व कर्मचार्‍यांंच्या वतीने आज इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांंनी पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना पत्र लिहिले आहे, या पत्रात शर्मा यांंनी कोरोनामुळे हेल्थकेअर कर्मचार्‍यांवर येणारा तणाव मांंडला आहे, तसेच कोरोनाशी लढताना डॉक्टर मंंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेत त्यामुळे त्यांंच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आर्थिक तरतुद करावी आणि मृत्यु झालेल्या कोविड योद्धा डॉक्टरांंच्या कुटुंंबाना भरपाई दिली जावी अशी विनंंती सुद्धा केली आहे.

आयएमए अध्यक्षांंनी लिहिलेल्या पत्रात, कोविड 19 शी लढताना मृत्यु झालेल्या डॉक्टरांंना शहीद म्हणुन संंबोधले जावे तसेच त्यांंच्यापाठी असणार्‍या कुटुंंबाला सरकारकडुन आर्थिक मदत दिली जावी, डॉक्टरांंची पत्नी किंंवा मुलांंना सरकारी नोकरी दिली जावी अशा ही मागण्या केल्या आहेत.

 

News English Summary: Indian Medical Association (IMA) President writes to PM Modi over doctors getting infected & dying due to COVID19 & urging him for inclusive National solatium for doctors. Letter reads, “Govt statistic states that 87000 healthcare workers were infected & 573 died due to Covid.

News English Title: Indian Medical Association President writes to PM Narendra Modi says 87000 healthcare workers are infected with covid 19-573 deaths News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x