पंतप्रधान मोदींच कोरोनाचे सुपर स्प्रेडर | इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या उपाध्यक्षांचं टीकास्त्र
मुंबई, २८ एप्रिल | कोरोनाने गेल्या एक वर्षात दोन लाखांपेक्षा जास्त लोक आपल्यातून हिरावून घेतले. मंगळवारी देशात सर्वाधिक ३,२८५ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी आकडेवारीत २,०१,१६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तथापि, खरे आकडे यापेक्षाही खूप जास्त आहेत. त्याचबरोबर देशात प्रथमच एका दिवसात २.६२ लाख लोकांनी कोरोनावर मात केली ही दिलासादायक बातमीही आली. आतापर्यंत १.४८ कोटी लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी ३,६२,७५७ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णांचा आकडा १.७९ कोटींवर गेला. चिंतेची बाब म्हणजे बरे होण्याचा दर घसरून ८२.३% झाला आहे, हा दर याच वर्षी १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू गेल्या वर्षी १२ मार्चला झाला होता. महामारीच्या दुसऱ्या लाटेत आकडे रोज नवा विक्रम घडवत आहेत. १० सर्वाधिक प्रभावित राज्यांतच एप्रिलमध्ये मृतांची संख्या ५ पट वाढली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ८९५ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६,१७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एका दिवसात ३८१ आणि यूपीत २६४ जणांचा मृत्यू झाला. अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर आता भारत दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू झालेला चौथा देश आहे.
दरम्यान, देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याने डॉ. नवज्योत यांनी मोदींना सुपर स्प्रेडर म्हटल्याचं, द ट्रेब्युने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सुपर स्प्रेडर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना करोनाचा संसर्ग होतो.
करोना विषाणूसंदर्भातील नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी करोनासंदर्भातील सर्व नियम मोडले,” असं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.
देशामध्ये करोनाचा पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये आढळून आला, असं सांगत डॉ. नवज्योत यांनी त्यावेळीही मोदींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही असं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार डॉ. नवज्योत यांनी, “देशातील पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये देशात आढळल्यानंतर मोदींनी यासंदर्भातील उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली,” असं म्हटलं आहे.
आता करोनाच्या दुसरी लाट अद्याप सर्वोच्च स्तरावर (पीकवर) पोहचलेली नसतानाही देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचं चित्र दिसत असतानाही पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही,” असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.
News English Summary: The vice president of the Indian Medical Association, the largest body of doctors in the country, Dr. Navjot Dahiya has said that Prime Minister Narendra Modi is a ‘super spreader’ of Corona. When the second wave of Corona came in the country, he agreed to hold political meetings and organize events like Kumbh Mela. Navjot called Modi a super spreader, according to a report in The Tribune. A super spreader is a person who infects as many people as possible with coronavirus.
News English Title: Indian Medical Association vice president Dr Navjot Dahiya called PM Narendra Modi super spreader of corona virus news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY