17 April 2025 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

देशाचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत - पंतप्रधान

Ladakh, India China, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १९ जून: भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी देशाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या रणनीतीसाठी सगळ्या पक्षांनी दिलेल्या सूचना या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या जनतेचं धैर्य वाढलं आहे. तसंच सैनिकांचं मनोबल वाढण्यासही या बैठकीने भूमिका पार पाडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील वर्षी देशाने आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी सीमा परिसरात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. नवीन बनलेल्या सुविधांमुळे विशेष करुन एलएसीजवळ आपल्या सैन्याची पेट्रोलिंग क्षमता वाढली आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर पहिले आपली नजर जात नव्हती त्याठिकाणी आपले जवान चांगल्यारितीने मॉनिटर करु शकत आहेत.

आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हतं. ना कोणी रोखत होतं. आता आपले जवान प्रत्येक हालचालींवर त्यांना रोखत आहेत त्यामुळे तणाव वाढला आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सर्वपक्षीय नेत्यांना आश्वस्त करतो की, देशाचे सैनिक भारताच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. सैन्यदलांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. जे काही गरजेचे आहे ते करा असं सांगण्यात आलं आहे.

भारत कधीही कोणाच्या दबावाखाली येणार नाही. देशाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहोत. निश्चितपणे चीनद्वारे एलएसीवर जे काही सुरु आहे त्यामुळे देशात आक्रोश आहे. हीच भावना सर्वपक्षीय बैठकीत आपल्या चर्चेदरम्यान पाहायला मिळाली असं नरेंद्र मोदी म्हणाले.

 

News English Summary: Indian troops are guarding the country’s borders like a mountain. Prime Minister Narendra Modi has said that no one has infiltrated Ladakh by violating the borders of his country. Our army, soldiers are doing their best to protect the country. Modi has also said that the national interest is the focus of all of us.

News English Title: Indian troops are guarding the country’s borders like a mountain said Prime Minister Narendra Modi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या