22 January 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

लडाखमध्ये भारताची ३८ हजार स्क्वे किमी जमीन चीनच्या ताब्यात | मोदी सरकारची कबुली

India China, Ladakh, Modi Govt, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर : भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत निवदेन सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असंही ते म्हणाले.

पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. लडाखमधील भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने POK मधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडे सोपवला अशी माहिती राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.

तसेच करारामध्ये असे सांगितले गेले आहे की, सीमेचे पूर्ण निराकरण होईपर्यंत एलएसीचे उल्लंघन केले जाणार नाही. १९९० ते २००३ या काळात दोन्ही देशांमध्ये एकमत होण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यानंतर चीन या दिशेने पुढे आला नाही. एप्रिल महिन्यापासून लडाखच्या सीमेवर चिनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांमध्ये वाढ झालेली दिसली. चिनी सैन्याने आमच्या पेट्रोलिंगमध्ये अडथळा आणला, त्या कारणामुळे ही स्थिती निर्माण झाली. आमच्या धाडसी सैनिकांनी चिनी सैन्याचे मोठे नुकसान केले आहे आणि सीमेचे रक्षणही केले आहे. देशाच्या सैनिकांनी पराक्रमाची आवश्यकता असलेल्या ठिकाणी शौर्य दाखवले आणि शांतता आवश्यक तेथे शांतता ठेवली असं राजनाथ सिंह यांनी सांगितले.

 

News English Summary: Addressing the Lok Sabha on the border tensions between India and China border, Defence Minister Rajnath Singh Tuesday said till now, there has been no mutually acceptable solution between the two countries as China continues to disagree on border. “China doesn’t recognise the traditional and customary alignment of the boundary. We consider that this alignment is based on well established geographical principals,” he said. “We have told China through diplomatic channels that the attempts to unilaterally alter the status quo were in violation of the bilateral agreements.” China continues to be in illegal occupation of approximately 38,000 sq. kms in #Ladakh. In addition, under the so-called Sino-Pakistan ‘Boundary Agreement’ of 1963, Pakistan illegally ceded 5,180 sq. km. of Indian territory in Pakistan Occupied Kashmir to China said Defence Minister.

News English Title: Indias Thirty Eight Thousand Square KM Land In Ladakh Illegally Occupied By China Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x