22 November 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Swachh Mahotsav | इंदूर सलग चौथ्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर

Indore, India's cleanest city, Swachh Mahotsav Swachh Survekshan

नवी दिल्ली, २० ऑगस्ट : केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर 9 व्या, धुळे 17 व्या तर नाशिक 23 व्या क्रमांकावर आहेत.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

1. इंदूर (मध्य प्रदेश)
2. सुरत (गुजरात)
3. नवी मुंबई (महाराष्ट्र)
4. अंबिकापूर (छत्तिसगढ)
5. म्हैसूर (कर्नाटक)
6. विजयवाडा (आंध्रप्रदेश)
7. अहमदाबाद (गुजरात)
8. नवी दिल्ली (दिल्ली)
9. चंद्रपूर (महाराष्ट्र)
10. खारगोने (मध्य प्रदेश)

केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सर्व्हेचा निकाल जाहीर केला. “काही वर्षांपूर्वी मी जपानी शिष्टमंडळाच्या सदस्यासह इंदूरला गेलो होतो. जेव्हा आम्ही शहरात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की तो इंदूरच्या वेगवेगळ्या भागात जात होता. मी त्याला विचारले “तुम्ही काय करत आहात?’ तो म्हणाला ‘मी अस्वच्छता शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण शक्य झाले नाही’. या शहराच्या यशाबद्दल दुसरा मोठा दाखला असेल असे मला वाटत नाही” असे हरदीपसिंग पुरी यांनी इंदूरने हा पुरस्कार जिंकल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना सांगितले.

 

News English Summary: Indore is India’s cleanest city in Swachh Survekshan 2020, the fifth edition of the annual cleanliness survey of the country. The city has bagged the spot fourth time in a row. Gujarat’s Surat on second spot and Maharashtra’s Navi Mumbai on third. In the category of population of less than 1 lakh, Maharashtra’s Karad bagged the first position, followed by state’s Saswad and Lonavala.

News English Title: Indore from Madhya Pradesh becomes Indias cleanest city under Swachh Mahotsav Swachh Survekshan News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x