22 December 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

VIDEO | महागाईमुळे मोदी समर्थक खासदार नवनीत कौर यांचा चुलीवर स्वयंपाक | समाज माध्यमांवर खिल्ली

MP Navneet Kaur Rana

मुंबई, ०३ ऑगस्ट | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.

त्यालाच अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांना टोला लगावला आहे. भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या राणा यांनी चुलीवर स्वयंपाक का केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनीही हा व्हिडिओ शेअर करत महागाईमुळेच नवनीत कौर चुलीवर स्वयंपाक करत असल्याचं म्हटलंय. गॅस महाग झाल्यामुळे खा. नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदारदेखील महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!

ट्विटरवर नवनीत कौर यांच्या नावाने एक अकाऊंट आहे. ज्या अकाऊंटवरुन त्यांच्या संदर्भातील बातम्या आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते. त्या अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच, कॅप्शनही देण्यात आलं आहे. ‘खासदार नवनीत राणा संसदेच्या अधिवेशनात जनतेचा आवाज उठवत आहेत. तर, शनिवारी व रविवारी अमरावती येथे कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुटुंबीयांसाठी जेवण बनवत आहेत’, असा आशय या व्हिडिओसह लिहिण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Inflation impact on Modi supporter MP Navnee Kaur Rana news updates.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x