24 November 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

रशियन लस'बाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याने भारत अधिक माहिती घेत आहे - ICMR

Corona Pandemic, ICMR DG Balram Bhargava

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : भारतात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ प्रक्रियेला सुरुवात होणार असताना करोनाबाधित रुग्णसंख्या ३१ लाखांच्या पुढे गेली असून आतापर्यंत ५८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा फैलाव होत असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“बेजबाबदार, काळजी न घेणारे लोक जे मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यामुळेच भारतात करोना महामारीचा फैलाव होत आहे,” असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे. दरम्यान भारतातील रिकव्हरी रेट वाढला अशून ७५.९२ टक्के झाला आहे. गेल्या २५ दिवसांत १०० टक्क्यांहून अधिक प्रगती झाली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्या 31 लाखांच्या पार गेली आहे. तर 58 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोरोना लस (Corona Vaccine) मिळण्याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. भारतात सध्या तीन कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. दरम्यान आता रशियाच्या लशीसाठीदेखील भारत प्रयत्नशील आहे.

रशिया आणि भारतामध्ये कोरोना लशीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आयसीएमआरने (ICMR) दिली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याने भारत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाने आपल्या स्पुतनिक व्ही (Sputnik V) लशीबाबत भारताशी चर्चा केली आहे. भारतातील रशियाचे राजदूत निकोलॉय कुदाशेव यांनी बायो टेक्निकल विभाग आणि आयसीएमआरशी संपर्क केला आहे. रशियाच्या राजदूतांनी भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन, बायो टेक्निकल विभागाचे सचिव रानू स्वरूप आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना रशियाच्या लशीबाबत माहिती आणि अहवाल दिला आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यासहदेखील रशियाच्या राजदूतांची बैठक झाली आहे.

सूत्रांच्या मते लशीबाबत सर्वात महत्त्वाची माहिती मिळणं बाकी आहे. रशियातही भारतीय राजदूत स्पुतनिक व्ही कोरोना लस तयार करणाऱ्या गॅमालिया नॅशनल सेंटर फॉर एपिडोमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीच्या संपर्कात आहेत. जेणेकरून भारताला या लशीबाबत जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. स्पुतनिक व्ही या लशीचं सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झालं असून ही लस सुरक्षित असल्याचा दावा रशियाने केला आहे. रशिया तब्बल 40,000 लोकांना ही लस देणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिलं होतं.

 

News English Summary: Russia and India are discussing the corona vaccine, according to the ICMR. India is trying to get as much information as possible as there are question marks over the safety of this vaccine.

News English Title: Irresponsible People Not Wearing Masks Driving The Pandemic In India Says ICMR DG Balram Bhargava News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ICMR(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x