दाट वस्तीतील रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये - केंद्राची सूचना
नवी दिल्ली, २० जून : केंद्रिय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनबाबत महत्वाच्या नव्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये दाट वस्तीतील अशा रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान, खास दिल्लीच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अशा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यापेक्षा रुग्णालय किंवा सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
‘काही राज्यांमध्ये सर्रासपणे कोरोना रुग्णाच्या होम आयसोलेशनला परवानगी दिली जात आहे. मात्र, त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा घराच्या शेजाऱ्यांनाही लागण होऊ शकते. विशेषतः दाट वस्तीत तसे होऊ शकते. त्यामुळे अशा भागातील रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देऊ नये’, असे लव अग्रवाल यांनी या पत्रात म्हटले आहे.
तसेच ‘रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू शकतो का याची खातरजमा करावी. याशिवाय जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम असली पाहिजे’, असेही या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पश्चिम उपनगरे आणि विशेषत: उत्तर मुंबईतील काही भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्यांची वाढ पाहता उत्तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सील इमारतींमधील नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर, महापालिकेचे नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
News English Summary: Love Agarwal, Joint Secretary, Union Ministry of Health and Family Welfare, has sent letters to all the states, issuing important new instructions regarding home isolation of Corona patients. It said such densely populated patients should not be allowed for home isolation.
News English Title: Isolation of Corona patients densely populated patients should not be allowed for home isolation News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार