22 April 2025 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

देशात २४ तासांत १३,५८६ नवे रुग्ण, एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठणार

Corona Victims, Covid 19, India

नवी दिल्ली, १९ जून : देशभरात दररोज दहा हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत असल्याने चिंता प्रचंड वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या लवकरच ४ लाखाचा टप्पा गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून १३ हजार ५८६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८० हजार ५३२वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ३३६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने देशातील कोरोनाबळींचा आकडा १२ हजार ५७३ इतका झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ४ हजार ७११ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून १ लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १ लाख ६५ हजार ४१२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या व ७.७८ टक्के रुग्णांची करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत ६२ लाख ४९ हजार ६६८ नमुना चाचण्या झाल्या आहेत.

राजधानीत सध्या २४२ नियंत्रित विभाग असून तिथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असून ७७ टक्के लोकांची वैद्यकीयदृष्टय़ा पाहणी करण्यात आली असून २० जूनपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना नमुना चाचण्यांचे दर कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आता मुंबईप्रमाणे दिल्लीतही नमुना चाचणी २४०० रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे. जलद निष्कर्षांसाठी रॅपिड अण्टिजिन चाचणीही सुरू झाली आहे.

 

News English Summary: Anxiety is growing tremendously as more than tens of thousands of new corona patients are added every day across the country. It is feared that the total number of corona victims in the country will soon reach 4 lakh.

News English Title: It is feared that the total number of corona victims in the India will soon reach 4 lakh News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या