29 January 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
x

भारतावर हल्ला करण्यासाठी जैश आणि ISI'ची बैठक | सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Jaish-e-Mohammed, ISI, Indian intelligence

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : भारतावर मोठा हल्ला घडवण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच रावळपिंडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये एक गोपनीय बैठक झाली. यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या बैठकीची माहिती मिळताच भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

गुप्तचरांच्या माहितीनुसार, अब्दुल रौफ असगरचा भाऊ मौलाना अम्मारही उपस्थित होता. अब्दुल रौफ असगर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर मौलाना अम्मारने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यात त्याने इंडियन एअर फोर्सचे फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. जैशच्या तालीम-अल-कुरान मदरशाला लक्ष्य केल्याबद्दल बदला घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

गुप्तचर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रावळपिंडीत अब्दुल रौफ आणि आयएसआयमध्ये एक बैठक झाली. या बैठकीचं आयोजन इस्लामाबादमधून करण्यात आलं होतं. जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी जरारनं भारतावरील हल्ले भारतावरील हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याच्या योजनेवर चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच बैठक पुलवामा हल्ल्याच्या आधीदेखील झाली होती.

 

News English Summary: The Indian intelligence establishment is on high alert after being tipped about a meeting between Jaish-e-Mohammed’s de-facto ‘emir’ Maulana Abdul Rauf Ashgar and two top rank ISI officials at Rawalpindi on August 20. Ashgar’s brother Maulana Ammar was also present at that meeting, says a confidential intelligence note.

News English Title: Jaish ISI Meeting Puts Indian Intelligence Agencies On High Alert News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x