9 January 2025 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY
x

भारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले

Jammu Kashmir, Weapons Recovered, Pakistani Drone Shot Down, BSF

जम्मू, २० जून : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा खुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हे ड्रोन गोळाबार करुन पाडण्यात यश आले आहे. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले.

१९ बटालियनच्या बीएसएफची एक टीम गस्त घालीत होती. यावेळी हिरानगर सेक्टरमधील रथुआ भागात पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. यावेळी बीएशएफच्या जवानांनी गोळीबार करत हे ड्रोन खाली पाडले.

कठुआ पोलीस नियंत्रण कक्षाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन हिरानगर सेक्टरमधील रथुआ परिसरात भारतीय हद्दीत पहाटे उडत असल्याचे आढळले होते. यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला हाणून पाडले. यासंदर्भात बीएसएफकडून देखील माहिती दिल्या जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी रेंजर्स आणि सैन्याकडून अशा घुसखोरी व टेहाळणी करणाऱ्या ड्रोनचा वापर, भारतीय जवानांच्या हालचालीवंर लक्ष ठेवण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी केला जात असून, याचाच वापर दहशतवाद्यांना माहिती पुरवण्यासाठी देखील केला जात आहे. हिरानगर सेक्टर नेहमीच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा परिसर ठरलेला आहे.

 

News English Summary: Border Security Force (BSF) personnel shot down a Pakistani drone at 5:10 a.m. today on the international border in Kathua district of Jammu and Kashmir. A BSF team spotted the drone flying in the Rathua area of Hiranagar sector in Kathua.

News English Title: Jammu Kashmir Weapons Recovered From The Pakistani Drone Shot Down By BSF News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x