18 November 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

विद्यार्थ्यांना हवी होती 'परीक्षा पे चर्चा' | पंतप्रधानांनी केली 'खिलौने पे चर्चा' - राहुल गांधी

JEE NEET, Pariksha Pe Charcha, PM did Khilone Pe Charcha, Rahul Gandhi

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 68व्या मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. देशभरात यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतोय. उत्सव आणि पर्यावरणाचं दृढ नातं आहे. निसर्ग संवर्धनासाठी उत्सवाचं आयोजन केलं जात असल्याचं मोदींनी सांगतिलं. कोरोनाच्या कठिण काळातही शेतकऱ्यांनी मोठं योगदान दिलं असून अन्नदाता शेतकऱ्यांना मोदींकडून मन की बातच्या सुरुवातीला नमन करण्यात आलं.

पंतप्रधान मोदींनी यावेळी मन की बातमध्ये बोलताना खेळण्यांच्या उद्योगावर भर देण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना काळात मुलं वेळ कसा घालवत असतील? त्यांच्या भवितव्याबाबत मंथन केलं असल्याचं मोदी म्हणाले. जगभरात खेळण्यांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, खेळण्यांच्या या ग्लोबल इंडस्ट्रीत भारताचं योगदान अतिशय कमी असल्याचं मोदी म्हणाले. भारत आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पुढे जात असून, भारतातील मुलांना भारतातच तयार केलेली नवीन खेळणी कशी मिळतील यावर विचार सुरु आहे, असंही मोदींनी सांगितलं. खेळण्यांची 7 लाख कोटींची मोठी बाजारपेठ आहे. टॉय इंडस्ट्री अतिशय व्यापक आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत भारताला पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. लोकल खेळणी वोकल करण्याचा प्रयत्न करुया.

दरम्यान, देशात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनंतर देखील NEET – JEE अंतिम वर्षाच्या परिक्षांवरून संतापाचं वातावरण आहे. मात्र त्याबाबत मोदींनी कोणतंही भाष्य केलं नसल्याने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदींना मन की बात वरून जोरदार टोला लगावला आहे. यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “JEE-NEET इच्छुकांसाठी पंतप्रधानांनी ‘परीक्षेचा चर्चा’ करायला हवी होती, पण पंतप्रधानांनी ‘खिलौने पे चर्चा’ केला.

 

News English Summery: Even after the Supreme Court decision in the country, there is an atmosphere of anger over the NEET-JEE final year exams. However, as Modi did not comment on it, Congress MP Rahul Gandhi has strongly criticized Modi. He tweeted that ‘JEE-NEET aspirants wanted the PM do ‘Pariksha Pe Charcha’ but the PM did ‘Khilone Pe Charch

News English Title: JEE NEET aspirants wanted the PM do Pariksha Pe Charcha but the PM did Khilone Pe Charcha said Rahul Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x