23 February 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

झारखंडमध्ये CBI'वर निर्बंध | भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांचा मोदी सरकारवर अविश्वास

Jharkhand state government, no entry to CBI

नवी दिल्ली, ०५, नोव्हेंबर: महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालनंतर आता झारखंडने देखील CBI’ला राज्यात चौकशीसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे यापुढे CBI’ला चौकशीसाठीची सामान्य संमती झारखंड राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात झारखंडमधील एखाद्या प्रकरणाची जर CBI’ला चौकशी करायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारची त्यांना अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

त्यामुळे यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ नंतर आता झारखंडने देखील सीबीआयला राज्यात चौकशीसाठीची सामान्य संमती रद्द केली आहे. सीबीआयला रोखणारं झारखंड हे पाचवं बिगर भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेलं राज्य ठरलं आहे.

सीबीआयला हाताशी धरुन मोदी सरकारकडून राज्यांमधील प्रकरणांवरुन तिथल्या सरकारांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडण्याचे काम केले जात असल्याचा आरोप सीबीआयवर निर्बंध आणणाऱ्या या राज्यांनी केला आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाकडून सरकारकडून CBI’चा गैरवापर केला जात असल्याच देखील या राज्यांचं म्हणणं आहे.

 

News English Summary: After Maharashtra, Kerala and West Bengal, now Jharkhand has also imposed restrictions on the CBI to investigate in the state. Therefore, the general consent of the CBI for inquiry has been revoked by the Jharkhand state government. Therefore, it has become clear that if the CBI wants to investigate a case in Jharkhand in the future, it will have to seek official permission from the state government.

News English Title: Jharkhand state government no entry to CBI news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x