26 January 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा
x

काँग्रेसचे प. बंगालचे प्रभारी जितिन प्रसाद यांचा काँग्रेसला प. बंगालमध्ये शून्य केल्यानंतर युपी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश

Jitin Prasad

नवी दिल्ली, ०९ जून | युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे भाजपने देखील मोठा गाजावाजा केल्याचं पाहायला मिळतंय. पण खरं वास्तव दुसरंच आहे.

भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा केला असला तरी हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं असं वृत्त आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जितिन प्रसाद हे काँग्रेसचे प. बंगालचे प्रभारी होते. मात्र त्यांनी आधीच भाजपशी हातमिळवणी करत काँग्रेसचा मतदार भाजपकडे वर्ग करण्यासाठी मोठी भूमिका बजावल्याचे वृत्त आहे. त्यांच्या याच सौदेबाजीमुळे काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये शून्य जागा मिळाल्या आहेत असं खात्रीलायक वृत्त काँग्रेसच्या गोटातून प्राप्त झालं आहे. तर पश्चिम बंगालमधील मोठ्या पराभवानंतर उत्तर प्रदेशात देखील कोरोनामुळे भाजपचे तारे फिरल्याने पक्षात चिंतेचं वातावरण आहे. परिणामी काही तरी साकाराम्तक चित्र उभं करण्यासाठी बुडत्याला काठीचा आधार या तत्वावर जितिन प्रसाद अशा शून्य निकाल देणाऱ्या नेत्याला काहीतरी भव्य असल्याप्रमाणे दाखविण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना जितीन प्रसाद म्हणाले की, “काँग्रेसमध्ये मला हे जाणवलं की आपण राजकारणात आहोत. जर तुम्ही तुमच्या लोकांच्या हितांचं रक्षण करू शकत नाहीत, त्यांची मदत करू शकत नाही, तर तुमचा राजकारणात राहून काय फायदा? मी काँग्रेसमध्ये हे करू शकत नव्हतो. गेल्या ३ दशकांपासून मी काँग्रेससोबत कार्यरत होतो. पण आज विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे. बाकी पक्षतर व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत.

 

News English Summary: Jitin Prasad, a senior leader from Uttar Pradesh who was a minister at the Center during the UPA-II, has joined the BJP, beating the Congress. Jitin Prasad has joined the BJP in the presence of Union Minister Piyush Goyal at the BJP headquarters in Delhi.

News English Title: Jitin Prasad a senior leader from Uttar Pradesh has joined the BJP news updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x