27 December 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या DSP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP बचतीवर मिळतील 1 कोटी 11 लाख रुपये, संधी सोडू नका Penny Stocks | 49 पैसे ते 85 पैशाचे 3 पेनी शेअर्स खरेदीला गर्दी, अप्पर सर्किट हिट, मालामाल करत आहेत - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | मल्टिबॅगर HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: HUDCO Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP
x

प. बंगाल | भाजप IT सेलचा पराक्रम | टीएमसीच्या बदनामीसाठी हिंसाचारात मृत कार्यकर्ता म्हणून पत्रकाराचा फोटो वापरला

Journalist Abhro Banerjee

कोलकत्ता, ०६ मे : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या हिंसाचारात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षानं केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल युनिटनं समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट टाकली आहे. त्या व्हिडिओत चुकीचा फोटो वापरल्याने मोठी नाचक्की झाली आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता माणिक मोईत्रा याच्याऐवजी इंडिया टुडेचा पत्रकार अभ्रो बॅनर्जी याचा फोटो लावला होता.

या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे. पण भाजपाने या व्हिडीओत ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनेलचा पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही.

पत्रकार अभ्रो बॅनर्जी यांना अनेक फोन आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांना सर्वप्रथम काय झालं हे समजलंच नाही. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलने व्हिडिओत त्यांचा फोटो लावल्याचं लक्षात आलं. ५ मिनिटं २८ सेकंदाचा व्हिडिओ बुधवारी अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला होता. या व्हिडिओनंतर मनस्ताप झाल्याने अभ्रो बॅनर्जी यांनी ट्वीट करुन जिवंत असल्याचं सांगितलं.

 

News English Summary: I am Abhro Banerjee, living and hale and hearty and around 1,300 km away from Sitalkuchi. BJP IT Cell is now claiming I am Manik Moitra and died in Sitalkuchi. Please don’t believe these fake posts and please don’t worry. I repeat: I am (still) alive said Abhro Banerjee news updates.

News English Title: Journalist Abhro Banerjee exposed BJP IT cell over West Bengal political crisis news updates.

हॅशटॅग्स

#BJPITCell(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x