7 January 2025 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, TCS शेअरमध्ये 39 टक्के तेजीचे संकेत, IT स्टॉक मालामाल करणार - NSE: TCS Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER
x

न्यायमुर्ती रमना होणार नवे मुख्य न्यायाधीश | थेट मुख्यमंत्र्यांकडून झाले होते भ्रष्टाचाराचे आरोप

Justice NV Ramana, Chief Justice Supreme Court, CJI NV Ramana

नवी दिल्ली, ६ एप्रिल: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमुर्ती एनवी रमना यांची नियुक्ती होणार आहे. ते भारताचे 48 वे मुख्य न्यायाधीश होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून ते 24 एप्रिल रोजी आपल्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेणार आहे. सध्या मुख्य न्यायाधीश बोबडे यांच्यानंतर ते सर्वात वरिष्ठ मुख्य न्यायमुर्ती असणार आहे.

न्यायमुर्ती एनवी रमना हे आंध्र प्रदेशाचे पहले असे न्यायमुर्ती असणार आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होणार आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षापेक्षा कमी असून ते 26 ऑगस्‍ट 2022 ला रिटायर होतील. यापूर्वी मुख्य न्यायाधीश बोबडे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये 47 व्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली होती.

दरम्यान, ऑक्टोबर 2020 मध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी रमण्णा आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मुख्यमंत्री रेड्डी यांनी सरन्यायाधीश बोबडे यांना चिठ्ठी लिहून त्याबाबत तक्रार केली होती. रमण्णा आणि त्यांचे कुटुंबीय अमरावतीतील भूखंड घोटाळ्यात सहभागी असल्याचा दावा रेड्डी यांनी चिठ्ठीत केला होता. सुनावणी आणि निर्णयांमध्ये हस्तक्षेप करून आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न रमण्णा करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रेड्डी यांनी केली होती.

हा वाद प्रचंड वाढला होता. त्याची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने रेड्डी यांच्यावर टीका करण्यात आली होती. ऑल इंडिया लॉयर्स यूनियनने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आरोप चुकीचे निघाल्यास रेड्डींना दंड ठोठावण्यात यावेत, अशी मागणी यूनियने केली होती. तर एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात रमण्णा यांनी त्यावर मौन सोडलं होतं. न्यायाधीश नेहमी सॉफ्ट टार्गेट असतात असं त्यांनी म्हटलं होतं. नोव्हेंबर 2020मध्ये सर्वोच्च न्यायालयात रेड्डींविरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात रेड्डी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती.

 

News English Summary: Justice NV Ramana will be the first Andhra Pradesh judge to become the Chief Justice of the Supreme Court. His term is less than two years and he will retire on August 26, 2022. Earlier, Chief Justice Bobade was sworn in as the 47th Chief Justice in November 2019.

News English Title: Justice NV Ramana become the Chief Justice of the Supreme Court news updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x