14 January 2025 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

वृद्ध शेतकरी आंदोलक महिलेची खिल्ली उडवल्याने कंगनाला कायदेशीर नोटीस

Kangana Ranaut, controversy, old farmer women protester

नवी दिल्ली, २ डिसेंबर: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत अनेकदा विवादित, धार्मिक तसेच जातीय ट्विट करण्यासाठीच प्रसिद्ध होऊ लागली आहे. सध्या ती विवादित ट्विट करण्यात नव नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. यापूर्वी तिने आंदोलक शेतकऱ्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती आणि तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एका वयोवृद्ध आजींवर टीका केल्याने ती नव्या वादात अडकली आहे. समाज माध्यमांवर तिला नेटिझन्सने धारेवर धरल्यावर तिने लगेच ट्विट डिलीट करण्याचा पराक्रम केला होता.

सध्या तिला समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. कारण तिने वास्तव जाणून न घेताच शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटला रिट्विट केलं होतं. ट्रोल झाल्यावर कंगनाने हे ट्विट लगेच डिलीट केलंय. मात्र लोकांना याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आणि आता तिला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस दादींसोबत केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला कायदेशीर नोटीस (Bollywood actress Kangana Ranaut has been sent a legal notice) पाठवण्यात आली आहे. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टातील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते हाकम सिंह (A senior lawyer and social activist Hakam Singh in the Punjab and Haryana High Court) यांनी कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे.

कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला ७ दिवसांचा अल्टीमेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सात दिवसात कंगनाने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Bollywood actress Kangana Ranaut has been sent a legal notice for comparing an elderly woman who took part in the farmers’ movement with her grandmother Bilkis, who took part in the Shahin Bagh movement in Delhi. Hakam Singh, a senior lawyer and social activist in the Punjab and Haryana High Court, has sent a legal notice to Kangana. Therefore, it seems that Bollywood actress Kangana Ranaut, who has come into the limelight due to her controversial statements, is once again in trouble.

News English Title: Kangana Ranaut controversy over criticizing 73 year old Delhi farmer protester News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x