16 April 2025 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

BREAKING | बंगाल हिंसाचारावरील संतापजनक ट्विट्स | कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड

Kangana Ranaut

नवी दिल्ली, ०४ मे | अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवर गरळ ओकण्यास सदैव तत्पर असणाऱ्या कंगना रानौतने पुन्हा धक्कादायक ट्विट करत धामिर्क तेढ वाढवायला सुरुवात केली होती. त्यासाठी ती आता थेट अप्रत्यक्ष दंगलीच्या चिथावण्या देत होती. यावेळी तर तिने हद्दच केल्याचं पाहायला मिळालं. कंगनाने ट्विट करताना म्हटलं होते की, “हे भीषण आहे, आपल्या गुंडी ला ठार मारण्यासाठी एक मोठी गुंडी हवी आहे, ती एक मुक्त दानव आहे. तिला वश करण्यासाठी मोदीजी कृपया तुमचं २००० पूर्वीच रुद्र रूप दाखवा असं म्हणत थेट गुजरात दंगलीच अप्रत्यक्ष उदाहरण दिलं होतं.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut’s Twitter handle has been suspended. She was prosecuted for sharing a post that violated Twitter’s rules. Action was taken after tweets on Bengal violence. Following the announcement of the results of the recent elections, the actresses tweeted offensive remarks about the alleged violence in West Bengal.

News English Title: Kangana Ranaut twitter account suspended after policy violation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या