8 January 2025 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

साहेब आजकाल आंबा कापून खात आहेत की चोखून - कन्हैया कुमार

Kanhaiya Kumar, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १२ जून: देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोजच विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत जवळपास ११ हजार नवे रुग्ण सापडले, तर जवळपास ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाखच्या जवळ जाऊन पोहोचली आहे आणि याबरोबरच भारत जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना व्हायरस प्रभावित देश बनला आहे.

कोरोना रुग्णांना मिळणारा उपचाराचा दर्जा आणि करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची लावण्यात येणारी विल्हेवाट याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना खडसावलं आहे. करोना रुग्णांच्या मृतदेहांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीदेखील यावेळी रुग्णांसोबत मृतदेह ठेवले जात असून काही ठिकाणी दोरीच्या सहाय्याने मृतदेह ओढण्यात आल्याचं उदाहरण दिलं. यावर न्यायमूर्ती शाह यांनी मग तुम्ही काय केलं आहे ? असा सवाल विचारला.

दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर थांबणार नाही. जुलैच्या सुरुवातीला किंवा मध्यावर अथवा ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल, असा अंदाज सर गंगा राम रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. एस. पी. ब्योत्रा यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे. मात्र कोरोनावरील लस पुढील वर्षाच्या तिमाहीपर्यंत तरी येणार नाही, अशी शक्यता ब्योत्रा यांनी वर्तवली. याआधी दिल्ली सरकारनंदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

देशातील या परिस्थिती मोदी नक्की आहेत तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावरून कन्हय्या कुमारने ट्विटरवरून मोदींची खिल्ली उडवणारा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यात कन्हय्या कुमारने ट्विट करताना म्हटलं आहे की, “२०२० मध्ये कोरोना, मजूरवर्ग, अर्थव्यवस्था अशा शुल्लक प्रश्नांमध्ये एक महत्वाचा प्रश्न हरवून गेला आहे….”साहेब आजकाल आंबा कापून खात आहेत की चोखून”

 

News English Summary: Although Modi is exactly in this situation in the country, many are wondering where he is. Kanhaiya Kumar has taken to Twitter to mock Modi. In it, Kanhaiya Kumar tweeted, “In 2020, an important question has been lost in the corona, the working class, the economy.”

News English Title: Kanhaiya Kumar asked question to PM Narendra Modi after corona situation in India News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Kanhiya Kumar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x