15 January 2025 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

कानपूर हत्याकांडातील कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार

Kanpur Gangster Vikas Dubey, Killed In Encounter, Uttar Pradesh

कानपूर, १० जुलै : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.

पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली. एका सुरक्षा रक्षकानं विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. विशेष म्हणजे त्याआधी विकास दुबे त्या परिसरात फोटो काढत होता. पोलिसांनी अटक केल्यावरही विकासच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नव्हता. विकास दुबेची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना तिथे काही लोक गोळा झाले होते. त्यांना पाहून तो ‘होय, मीच विकास दुबे, कानपूरवाला’ असं ओरडलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी विकासला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

News English Summary: Gangster Vikas Dubey was killed in an encounter after a road accident on Friday morning while being taken to Kanpur in Uttar Pradesh from Madhya Pradesh, where he was arrested yesterday – say the police. Vikas Dubey snatched the gun of a policeman and tried to run but was surrounded, the police said, asserting that they had tried to get him to surrender.

News English Title: Kanpur Gangster Vikas Dubey Killed In Encounter Uttar Pradesh News latest Updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x