25 January 2025 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी कंपनीत नोकरी करून 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, आकडेवारी जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
x

कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपची डोकेदुखी संपली आणि बंडखोर आमदारांच्या जीवावर सत्ता राखली

karnataka chief minister bs yeddyurappa

बंगळुरू: कर्नाटकमध्ये असलेल्या मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या भारतीय जनता पक्ष सरकारचं भवितव्य आज ठरणार आहे. विधानसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता जवळपास चित्र स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षाने १५ पैकी १२ जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस २ आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला किमान ७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं.

कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता टिकविण्यासाठी ६ जागांची गरज होती. आता १२ जागांवर आघाडीवर असल्याने भारतीय जनता पक्षाची जवळपास चिंता मिटल्यात जमा आहे. यामुळे दक्षिण भारतातील एकमेव राज्य ताब्यात ठेवण्यात भारतीय जनता पक्षाला यश येणार आहे. येडीयुराप्पांनी ही खेळी केलेली असली तरीही या १५ बंडखोर आमदारांनी भवितव्य पणाला लावले होते. यामुळे त्यांची आमदारकीही रद्द झाली होती. याचे बक्षिस या निवडून येणाऱ्या आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

२२५ जागांच्या कर्नाटक विधानसभेत २२३ जागांपैकी १५ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सध्या भारतीय जनता पक्षाकडे १०५, काँग्रेस ६६ (११ बंडखोर) जेडीएस ३४ (३ बंडखोर), केपीजेपी १, बसपा १ आणि १ अपक्ष आमदार आहेत. कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला १५ जागांवर झालेला पराभव मान्य करावा लागणार आहे. आम्हाला विजय मिळाला नाही, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतात, असे डीके शिवकुमार म्हणाले.

 

Karnataka Bypoll Election those Twelve Rebel MLAs will get Ministerial Berth Karnataka Minister says Karnataka Chief Minister BS Yeddyurappa

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x