25 January 2025 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी कंपनीत नोकरी करून 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, आकडेवारी जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
x

कर्नाटक: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत १५१ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

Congress, BJP, JDS

बंगळूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.

परंतु, नुकत्याच राज्यात ४१८ प्रभागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पडल्या होत्या आणि त्याचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर राज्यात काँग्रेसची हवा असल्याचं स्पष्ट झालं असून, राज्यात आणि केंद्रात सत्ता असून देखील भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसने ४१८ प्रभागांपैकी सर्वाधिक १५१ जागांवर विजय संपादित करून प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारतीय जनता पक्ष एकूण १२५ जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

विशेष म्हणजे जनता दल सेक्युलरने एकूण ६३ जागा जिंकल्या आहेत. कर्नाटकातील ९ जिल्ह्यांतील महानगरपालिका आणि नगपालिकांचा समावेश होता. या निकालामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असून, भाजपाची चिंता वाढली आहे. कारण लवकरच विधानसभेच्या १६ जागांसाठी पोटनिवडणुका होणार असल्याने त्यावर देखील या निकालांचा परिणाम जाणवणार असं स्थानिक राजकीय मत व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x