16 April 2025 8:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

कोरोना आपत्ती | कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं | दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक

India corona pandemic

नवी दिल्ली, ११ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.

दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सोमवारी सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच कर्नाटकने दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं असून नकोसं पहिलं स्थान मिळवलं आहे. भारतात फेब्रुवारीच्या मध्यात करोनाची दुसरी लाट आल्यापासून पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्ये सोमवारी २४ तासांत ३९ हजार ३०५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकूण ५९६ जणांचा मृत्यू झाला. एकीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या दोन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच साडे तीन लाखांपेक्षा कमी झाल्याची नोंद होत असताना कर्नाटकमध्ये मात्र चिंता वाढवणारी संख्या समोर आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात सोमवारी ३७ हजार २३६ रुग्णांची तर ५४९ मृत्यूंची नोंद झाली.

 

News English Summary: Karnataka recorded the highest number of corona patients on Monday. Apart from this, Karnataka has pushed Maharashtra to the second position in the daily number of patients and deaths and has got the first position. This is the first time since the second wave of corona hit India in mid-February.

News English Title: Karnataka recorded the highest number of corona patients on Monday in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या