15 January 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

केरळात परीक्षा देणारे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह; ६०० पालकांविरोधात गुन्हा दाखल

India, Kerala, Students Exam, Covid19 Positive

थिरुअनंतपूरम, २२ जुलै : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

दुसरीकडे महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती आधीच जाहीर केली आहे. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं होतं की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली होती.

दुसरीकडे केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आणि त्यामुळे UGCच्या निर्णयावर विचार करण्याची वेळ आली आहे. केरळमध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य (आर्किटेक्चर), वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला उपस्थित असलेला एक १७ वर्षीय विद्यार्थी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर मंगळवारीही (२१ जुलै) दोन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. दरम्यान, केरळ पोलिसांनी परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधात सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

 

News English Summary: Two students who appeared for the Kerala Engineering Architecture Medical (KEAM) examination in Thiruvananthapuram on July 16 have tested positive for Covid-19. A parent of a third student who sat for the exam has also been detected with the infection, prompting health officials to begin a hectic contact tracing exercise in a city which has been under a strict lockdown for the past two weeks.

News English Title: Kerala Police Booked Over 600 Parents Of Students Who Appeared For Entrance Exam News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x