22 November 2024 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आणीबाणी: 'हा नवा भारत आहे' सांगणारे भाजप नेते अजूनही जुन्या आठवणीतच मग्न

Narendra Modi, Amit Shah, Rajanath Singh, Indira Gandhi

नवी दिल्ली : देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. २५ जून १९७५ रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला तब्बल ४४ वर्ष उलटली आहेत. आणीबाणी विरोधात पंतप्रधानांसह भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातील एक खास व्हिडीओ ट्विट केला आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खास बॅनर बनवून राजकीय स्वार्थासाठी देशातील लोकशाहीची हत्या केली असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीवर ट्विट करताना लिहिलं आहे की, देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी नेहमी आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण असणं गरजेचे आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात संसदेत आणीबाणीवर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा काही भागही दाखविण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, १९७५ मध्ये आजच्याच दिवशी आपल्याला राजकीय फायद्यासाठी देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली होती. देशातील नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेतले होते. वृत्तपत्रांवर टाळे लावले होते. लाखो देशभक्तांना देशात पुन्हा लोकशाही आणण्यासाठी नरकयातना सहन कराव्या लागल्या होत्या. त्या सर्वांना मी नमन करतो असं शहांनी लिहिलं आहे.

दरम्यान, स्वतःची पाठ थोपटताना वारंवार ‘ये नया भारत हैं’ अशी घोषणा देणारे मोदी सरकार वेळ काढून आणि अगदी ऑर्डर देऊन व्हिडिओ आणि बॅनर्स त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरून झळकावून लोकांना जुन्याच आठवणीत रममाण करण्यात धन्यता मानत आहेत. विशेष म्हणजे अजूनही पुढील काही वर्ष इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या नावानेच भाजपचे नेते ‘नव्या भारतात’ स्वतःच राजकारण करत राहतील अशीच शक्यता सध्यातरी दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x