17 April 2025 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

Kisan Mahapanchayat | कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा या तारखेला भारत बंद

Rakesh Tikait

नवी दिल्ली, ०५ सप्टेंबर | कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.

कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा या तारखेला भारत बंद – Kisan Panchayat in Muzaffarnagar farmer leader Rakesh Tikait announced Bharat Band on 27 September :

मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेस टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेळावे भरवत आहेत. तसेच या महापंचायतीमध्ये राकेश टिकैत केंद्र सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत.

महापंचायतीदरम्यान राकेश टिकैत एखादी मोठी घोषणा करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. टिकैत यांनी कृषी आंदोलनबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याआधी किसान मोर्चाने 25 सप्टेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल असे सांगितले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kisan Panchayat in Muzaffarnagar farmer leader Rakesh Tikait announced Bharat Band on 27 September.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RakeshTikait(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या