याला कोर्टाचा अवमान म्हणू नका | त्याला भविष्यातील राज्यसभेच्या सीटचा अवमान म्हणा - कुणाल कामरा
मुंबई, १३ नोव्हेंबर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत भर पडली असून अवमान खटला दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी त्यास मान्यता दिली आहे. यानंतर कुणाल कामरा याने ट्विट करत आपली बाजू मांडली असून पुन्हा एकदा उपहासात्मकपणे टीका केली आहे. त्याने ना वकील, ना माफी, ना दंड अशी कॅप्शन दिली आहे.
Don’t even call it contempt of court call it contempt of future Rajya Sabha Seat 😂😂😂
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 12, 2020
“मी केलेलं ट्विट सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत असल्याचं आढळलं आहे. मी जे ट्विट केलं होतं ते माझं सर्वोच्च न्यायालयाने प्राइम टाइम लाऊडस्पीकरविरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयावरील मत होतं,” असं कुणाल कामराने म्हटलं आहे. कुणाल कामराने यावेळी माफी मागण्यास नकार दिला असून, “माझं मत अद्याप देखील तेच असून इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने बाळगलेलं मौन टीका न करता दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही,” असं म्हटलं आहे. कुणाल कामराने यावेळी आपल्यावरील खटल्याचा वेळ माझ्याइतकं महत्त्व आणि संधी न मिळालेल्या इतर महत्वाच्या प्रकरणांना द्यावा असंही म्हटलं आहे. यावेळी त्याने काही प्रकरणांचा उल्लेखही केला आहे. “माझी वेळ इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना दिली तर आभाळ कोसळेल का?,” असंही कुणाल कामराने विचारलं आहे.
“सर्वोच्च न्यायालयाने अद्याप माझ्या ट्विटसंबंधी काही जाहीर केलेलं नाही. पण जेव्हा कधी करतील तेव्हा ते हसतील,” अशी आशा कुणाल कामराने व्यक्त केली आहे. यावेळी कुणाल कामराने आपण एका ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयात महात्मा गांधींच्या ऐवजी हरिश साळवे यांचा फोटो लावावा अशी मागणी केल्याची आठवण करुन देत पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.
News English Summary: Republic TV editor and journalist Arnab Goswami’s tweet after the Supreme Court granted him bail has added to the woes of stand-up comedian Kunal Kamra and allowed him to file a contempt case. It has been approved by Attorney General KK Venugopal. After this, Kunal Kamra defended himself by tweeting and once again criticized sarcastically. He has given no caption like lawyer, no apology, no penalty.
News English Title: Kunal Kamra again twit on Arnab Goswami and Supreme court case matter news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON