22 December 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

'दो मई, दीदी गई' म्हणणारे नेते निकालानंतर 'किधर गई'? | अमित शहा बेपत्ता झाल्याबाबतची पोलिसात तक्रार

Amit Shah

नवी दिल्ली, १३ मे | काँगेसच्या नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडियाने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे. अशावेळी प्रस्थापित नेत्यांनी केवळ भारत सरकार किंवा भारतीय जनता पक्षाच्या सरकारलाच उत्तर देणे बंधनकारक नाही तर देशातील नागरिकांनाही उत्तर देणे कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितले.

अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की, फक्त भारतीय जनता पक्षाचे? असा थेट प्रश्न उपस्थित करत नागेश करियप्पा म्हणाले की, आम्ही कोरोना काळात लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाणतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार आणि त्यांचे सर्वोच्च नेतृत्व गायब झाल्याबद्दल आम्ही एनएसयूआयने ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना शोधलं जाईल आणि ते पुन्हा त्यांचे कर्तव्य निभावतील अशी अपेक्षा आहे असा चिमटाही काँग्रेसने भारतीय जनता पार्टी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लगावला आहे.

 

News English Summary: The National Students Union of India (NSUI) on Wednesday lodged a complaint with the Delhi Police against the disappearance of Union Home Minister Amit Shah. NSUI National General Secretary Nagesh Kariyappa, while lodging a complaint with the police station about the disappearance of Amit Anilchandra Shah, said that the entire country was suffering from the corona epidemic and the people of the country were in crisis.

News English Title: NSUI lodged a complaint with the Delhi Police against the missing of union home minister Amit Shah during corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x