15 January 2025 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

२६/११ तील दहशदवाद्यांचे आभार? करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं

sadhvi pragya singh thakur, IPS Hemant Karkare

भोपाळ : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान त्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या भयानक दहशदवादी हल्ल्यात अनेक निर्दोष नागरिकांसह वरिष्ठ तसेच कनिष्ठ पोलीस देखील शहीद झाले होते. दरम्यान, त्या हल्ल्यात अजमल कसाब या दहशदवाद्याला जिवंत पकडताना हवालदार तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हेमंत करकरे तसेच विजय साळसकर यांच्यासह अनेक धाडसी अधिकारी मुंबई पोलिसांनी गमावले होते.

परंतु त्याच शहीद अधिकाऱ्यांच्या मृत्यूवरून मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आणि भाजपच्या भोपाळमधील विद्यमान उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने धक्कादायक विधान केलं आहे. हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं असं संतापजनक वक्तव्य भोपाळ येथे उपस्थितांना संबोधित करताना केलं आहे. विशेष म्हणजे अनेक भाजप समर्थकांनी या संबंधित बातम्या व्हिडिओ सकट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ‘लव’ इमोजीद्वारे व्यक्त होत, स्वतःच्या भावना कोणत्या थराला जाऊन पोहोचल्या आहेत याचा पुरावा दिला आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x