22 December 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

लोकसभेत बेरोजगारी व देशाच्या प्रगतीवर भाष्य करताना राहुल गांधींकडून मोदींचा एकेरी उल्लेख

PM Narendra Modi, Rahul Gandhi, Loksabha Adjourned

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले.

लोकसभेत शुक्रवारी राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन हंगामा झाला. हा गदारोळ इतका वाढला की खासदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. खरंतर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चांगलाच समाचार घेतला होता. ”मी ६ महिन्यात सूर्यनमस्कार करुन स्वतःला दंडाप्रुफ करुन घेईन. माझी जनताच माझं संरक्षण कवच आहे” असं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं होतं.

नेमकं काय घडलं?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं. त्यात त्यांनी, ‘तरुणांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय, देशाची प्रगती होणार नाही,’ असे सांगताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून काल, निवेदन देताना पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले होते. ‘मी माझे सूर्यनमस्कार वाढवेन आणि लाठ्या खाण्यासाठी माझी पाठ मजबूत करून घेईन.’, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत करून, सत्ताधारी बाकांवरून टाळ्या मिळवल्या होत्या. आज, पुन्हा याच मुद्द्यावरून सभागृहात काँग्रेस-भाजप सदस्य आमने-सामने आले आहेत.

त्यात राहुल गांधी यांनी आपल्या भाषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. ते म्हणाले, “ये जो नरेंद्र मोदी भाषण दे रहा है| हिंदुस्तान के युवा इसको ऐसा डंडा मारेंगे की, छह महिनेबाद ये घर से बाहर नहीं निकल पायेगा” आणि यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

 

Web Title:  loksabha adjourned after uproar over of Rahul Gandhi statement on PM Narendra Modi.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x