15 January 2025 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर: ममता बॅनर्जी

Loksabha Election 2019, Narendra Modi, Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठी शंका उपस्थित केली आहे. ‘एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो’, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

दरम्यान, काल लोकसभेसाठी ७व्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध टीव्ही वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरुन ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, ‘मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू’.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x