16 April 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

लोकसभा २०२४ पवार इन ऍक्शन मोड | मोदी सरकारविरोधात दिल्लीत बोलावली १५ विरोधी पक्षांची बैठक

Loksabha Election 2024

नवी दिल्ली, २१ जून | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभेसाठी त्यांनी विरोधकांची मुठ बांधणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सोमवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी 4 वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. मोदी सरकारच्या विरोधात 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची सुरुवात केली होती.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्ष फिजिकल मीटिंग करणार आहेत. राष्ट्र मंच अंतर्गत होणाऱ्या बैठकीत 15 विरोधी पक्षांचे नेते सामील होतील. बैठकीत यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, पवन वर्मासह अनेक नेत्यांचा सहभाग असू शकतो. शरद पवार पहिल्यांदाच राष्ट्र मंचच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. सध्या हा मंच राजकीय नाही, पण भविष्यात यातून तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी, शरद पवारांनी 15 दिवसांत दुसऱ्यांना निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. 11 जूनला प्रशांत किशोर यांनी शरद प पवार यांच्या मुंबईतील घरी भेट घेतली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती. त्या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

उद्याची बैठक का महत्वाची ?
* 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी सुरू करण्याती तयारी.

* प्रशांत किशोर बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विजयानंतर तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनणार.

* शरद पवार तिसऱ्या आघाडीचे समन्वयक असू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Loksabha Election 2024 After meet with Prashant Kishor Sharad Pawar called meeting in Delhi residence of 15 opposition parties on 22nd June 2021 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या