22 December 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
x

BREAKING | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात पुन्हा महत्वाची बैठक

Loksabha Election 2024

नवी दिल्ली, २३ जून | शरद पवार दिल्लीत पोहोचल्यानंतर जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. एकूण पवार आणि प्रशांत किशोर २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची भूमिका बजावणार हे अधोरेखित होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या योजनेबद्दल कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात येत नसल्याने गुंता अधिक वाढत चालला असून भाजपच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे.

आज पुन्हा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांची गेल्या ३ दिवसांतील ही दुसरी भेट आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. यानंतर आज प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. पवार आणि किशोर यांच्यात परवाच एक बैठक झाली होती. गेल्या तीन दिवसांत पवार आणि किशोर यांच्यात होत असलेली ही दुसरी बैठक आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधकांच्या बैठकीआधी शरद पवारांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर कालच पवार विरोधी पक्षातील नेत्यांना भेटले. या बैठकीत तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा न झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन यांनी दिली. याशिवाय राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीतही रस नसल्याचं पवारांनी सांगितलं.

यानंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा पवारांच्या भेटीला गेले आहेत. मागील १५ दिवसांमधील ही तिसरी भेटआहे. याआधी मुंबईत ११ जूनला पवार आणि किशोर यांची बैठक झाली होती. त्यानंतर २१ जूनला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवार आणि किशोर यांच्यात जवळपास साडे तीन तास चर्चा झाली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Loksabha Election 2024 Prashant Kishor again meet to NCP president Sharad Pawar at Delhi residence news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x