23 February 2025 8:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

गॅसच्या किंमत १५०'ने वाढल्याने आंदोलन करणाऱ्या भाजपच्या सदस्यांशी मी सहमत: राहुल गांधी

Union Minister Smriti Irani, LPG Price Hike, Rahul Gandhi

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. दरवाढ किंवा घट ही महिन्याच्या १ तारखेलाच होत असते. मात्र, अचानक दरवाढ केल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सिलेंडरचा दर ७२१.५० रुपये इतका होता. मात्र, तो आता वाढून ८६६.५० रुपये झाला आहे. पुण्यात काल ७०४ तर आज तब्बल ८४९ रुपये असा सिलेंडरचा दर आहे.

दर महिना सबसिडी आणि बदलत जाणाऱ्या बाजार भावानुसार गॅसच्या किंमतीत बदल होत असतो. याआधी १ जानेवारी २०२० रोजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या होत्या. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या दरामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता. सरकार दरवर्षी १२ सिलिंडरवर अनुदान देते. बजेटच्या आधी कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये २२४.९८ रुपयांची वाढ झाली असून, व्यापाऱ्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी १५५०.०२ रुपये मोजावे लागत आहेत.

घरगुती गॅसच्या किंमती वाढल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजपला टोला हाणलाय. या फोटोमध्ये स्मृती इराणी गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर आंदोलन करताना दिसत आहेत. ‘एलपीजी सिलिंडरच्या किंमती १५० रुपयांनी वाढल्याचा विरोध करणाऱ्या या भाजपच्या सदस्यांशी मी सहमत आहे’ असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला टोला हाणलाय.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला स्मृती इराणी यांचा हा फोटो १ जुलै २०१० रोजीचा आहे. त्यावेळी स्मृती इराणी या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष राहुल सिन्हा यांच्यासोबत त्यांनी कोलकातामध्ये आंदोलन केलं होतं.

 

Web Title: LPG price hike Congress MP Rahul Gandhi hit out BJP with Union Minister Smriti Irani photo.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x