24 November 2024 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मध्य प्रदेश | BSF जवानाची आपल्या पत्नीला बेड मिळावा म्हणून दिवसभर वणवण | जवानाला अश्रू अनावर

Madhya Pradesh corona pandemic

भोपाल, २१ एप्रिल: देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ एक्टीव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा रुग्णांच्या वाढत्या संख्येने कोलमडून गेल्याचं पाहायला मिळतंय. मध्य प्रदशातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अगदी सीमेवर देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना देखील या भीषण आपत्तीचा कटू अनुभव येतो आहे. देशातील अनेक राज्यांमधील रुग्ण नातेवाईकांसह रुग्णालयांबाहेर उपचारांसाठी प्रतीक्षा करत आहेत. परंतु, त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातील एका जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. जवान आपल्या पत्नीला घेऊन वणवण फिरत आहे. परंतु त्यांना बेड मिळत नाही.

सीमेवर कर्तव्य बजावणारे बीएसएफ जवान कोरोनाग्रस्त पत्नीला घेऊन कारमधून एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत आहे. आठ तासांपासून त्याची वणवण सुरू आहे. पत्नीला कुठे दाखल करावं, याची माहिती कोणीही जवानाला देत नाहीए. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे जवान मदत मागत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यानं आपली व्यथा मांडली. त्यानंतर काही माध्यम प्रतिनिधींनी त्याला मदत केली. त्यानंतर त्याच्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसल्यानं, बेड उपलब्ध होत असल्यानं जवान अतिशय हतबल झाला होता. माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्याला अश्रू अनावर झाले. ‘आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीएत,’ असं म्हणत जवानानं आक्रोश केला. मध्य प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये सध्या अशीच स्थिती आहे.

 

News English Summary: A BSF jawan on duty at the border is traveling from one hospital to another in a car with his wife. It has been going on for eight hours. No one informs the soldier where to take his wife. The jawan is asking for help from those who come and go. He expressed his grievances to the media representatives. He was then assisted by some media representatives. His wife was later admitted to Sanjay Gandhi Hospital.

News English Title: Madhya Pradesh corona pandemic BSF Jawan crying for Covid positive wife to get bed in hospital news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x