22 January 2025 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण | महाराष्ट्रात-दिल्ली प्रवास सेवेबाबत महत्वाचा निर्णय होणार?

Maharashtra, Delhi Covid19, Trains, Flights Service

मुंबई, २० नोव्हेंबर: दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई दिल्ली दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दिवाळीच्या आधीच दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका कमी होतोय म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

राजधानी दिल्लीतील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दिल्लीतील शहीद भगतसिंग ट्रस्टच्या दोन स्वयंसेवकांनी एक व्हिडीओ पोस्ट करत कोरोना स्थितीची गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. हा व्हिडीओतील दोन्ही स्वयंसेवक कोविड मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास मदत करत आहे. तसेच दिल्लीतील नेमकी परिस्थिती कशी आहे, हे सांगितलं आहे.

 

News English Summary: The state government is considering shutting down air and rail services between Mumbai and Delhi as a precautionary measure in view of the rising number of corona in Delhi. According to sources, a decision in this regard may be taken in the next one or two days. It has also come to light that correspondence is being sent to the concerned departments to stop Mumbai-Delhi and Delhi-Mumbai flights as well as rail travel.

News English Title: Maharashtra govt may stop flights train between Delhi Mumbai after corona crisis second wave news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x