15 November 2024 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे, केंद्राने सहकार्य करावं - राहुल गांधी

Rahul Gandhi, Indian Economy, Maharashtra

नवी दिल्ली, १६ मे : लॉकडाऊनमध्ये शेतकरी, मजुरांचे हाल होत आहेत, त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, त्यांच्या खिशात पैसा द्यायला हवा, लोक रस्त्यावर तहान-भुकेने चालत आहेत, त्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना स्थिती आणि सरकारचं पॅकेज यावर भाष्य केलं. शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करू नका, ते रेटिंग नंतर सुधारू शकेल, सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय, ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या रेटिंग आपोआप सुधारेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला हाणला आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर पुनर्विचार करावा. गरीबांना त्यांनी पैसे देण्याची गरज आहे. जर मागणी कमी झाली तर देशाचं करोनामुळे जितकं मोठं नुकसान झालेलं नाही त्याहून मोठं आर्थिक नुकसान होईल”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्या. सरकारने रेटिंग्स, जगातील प्रतिमेचा विचार आज करु नये. शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात”.

महाराष्ट्र हे केवळ मोठं राज्य नसून युनिक स्टेट आहे. महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचं केंद्र आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार जेवढा जास्त सपोर्ट राज्य सरकारला देईल, तेवढं चांगलं आहे. सर्व, राज्यांकडूनच हे डिलिव्हर होणर आहे. केंद्र सरकारचं काम हे व्यवस्थापनाचं काम असून राज्य सरकारचं काम ऑपरेशनचं आहे. त्यामुळे, लढाई लढण्याचं काम राज्य सरकारकडून होत आहे. म्हणून, राज्य सरकारला केंद्राने मदत, सहकार्य करणे आवश्यक असल्याच राहुल गांधींनी म्हटलं.

 

News English Summary: Maharashtra is not only a big state but also a unique state. Maharashtra is the hub of India’s economy. The more support the central government gives to the state government in the fight against Corona, the better. All in all, it will be delivered by the states.

News English Title: Maharashtra is the center of India’s economy the center should cooperate said congress MP Rahul Gandhi.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x