22 November 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शिंदे गटाची धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती | शिंदे भाजपच्या योजनेवर चालत असल्याचं सामोरं येतंय

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी करण्यासाठी घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश एम. आर. शहा, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हीमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा या घटनापीठात समावेश असेल. आज सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. यासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेनेतून वेगळे झालेले एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेली आहे.

दरम्यान, शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने थोडक्यात युक्तिवाद ऐकून घेतला आहे. या प्रकरणावर आता 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्थगितीवर 27 तारखेला निर्णय होणार आहे.

यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी झाली. मात्र या प्रकरणावर आता 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय करू शकतो यावर आम्ही 27 सप्टेंबर रोजी एकत्र येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला थोडक्यात ऐकू आणि काही निर्देश आवश्यक आहेत का ते ठरवू. त्याच दिवशी निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकून घेऊ असं न्यायालयाने म्हटले. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकतो की नाही हे न्यायालयाने ठरवायचे आहे.

आम्हीच खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं सुद्धा आमचं असा दावा :
बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आम्हीच खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं सुद्धा आमचं असा दावा करत आलं आहे. मात्र आज त्यांनी थेट धनुष्यबाण चिन्हं गोठविण्याची विनंती न्यायालयात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यावरून ते भाजपने आखून दिलेल्या मुद्यांवर काम करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं शिंदे गटाच्या न्यायालयात विनंती करून गोठवता येऊ शकतं का यासाठी हा मुद्दा पुढे केल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. तसं झाल्यास भाजपच्या चिन्हाला प्रमोट कारण सोपं जाईल आणि शिवसेना नवीन चिन्हं लोकांपर्यंत पोहोचविण्यात गुंतून पडले असा प्लॅन असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धनुष्यबाण चिन्हं म्हणजे ठाकरे अशी ओळख मुंबई आणि महाराष्ट्रातील मतदारांमध्ये असल्याने भाजपाला उद्धव ठाकरेंना माथ देणे कठीण असल्याने या मुद्द्यावर प्रथम जोर देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Political Crisis issue in Supreme Court check details 07 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x