23 February 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी ममतांच देशातील प्रमुख नेत्यांना पत्र

Mamata Banerjee, oppositions leaders, writes Letter

कोलकत्ता, ३१ मार्च: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे एमके स्टॅलिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी या पत्रातून केलं आहे.

बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असताना ममता बॅनर्जींनी देशातल्या भाजप विरोधक पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करायला हवा, असं आवाहन ममता बॅनर्जींनी केलं आहे.

 

News English Summary: Mamata Banerjee writes to leaders incl Sonia Gandhi, Sharad Pawar, MK Stalin, Tejashwi Yadav, Uddhav Thackeray, Arvind Kejriwal, Naveen Patnaik stating, “I strongly believe that the time has come for a united & effective struggle against BJP’s attacks on democracy & Constitution.

News English Title: Mamata Banerjee writes a letter to top oppositions leaders in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x