9 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

शुल्लक भांडणावरून पत्नीचं मुंडकं कापून थेट पोलीस ठाण्यात पोहोचला

Uttar Pradesh, Barabanki gaon, Man cut off head of wife

बाराबंकी: उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुल्लक घरगुती वादात पतीने पत्नीची हत्या केली आणि तिचा थेट शिरच्छेद केला आणि पोलिस स्टेशन गाठले. त्या युवकाला पाहून पोलिस कर्मचारीही बुचकळ्यात पडले होते. अखिलेश रावत असे आरोपीचे नाव आहे. तो बाराबंकीच्या जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरातील बहादूरपूर गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नीचं मुंडकं जहानगीराबाद पोलिस ठाण्यात नेले होते.

तो पोलीस स्टेशनमध्ये आला तेव्हा पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी त्याच्यापासून त्याच्या पत्नीचं मुंडकं काढून घेण्याचा प्रयत्न करताच त्याने राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली असं पोलीस म्हणाले. त्यानंतर बरीच मेहनत घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीचे डोके त्याच्या हातातून मुक्त केले. मात्र काही वेळातच आरोपीच्या विकृतीची दहशत आसपासच्या परिसरात पसरली होती.

पोलिस अधीक्षक डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, घरगुती वादात या तरूणाने आपल्या पत्नीचे शिरच्छेद केला आणि ते मुंडक घेऊन तो पोलिस ठाण्यात पोहोचला होता. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

Web Title:  Man cut off head of wife in Uttar Pradesh Barabanki gaon.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x