चिकन, मटन, मासे न खाता गोमांस खावे, भाजपाच्या मंत्र्याचा लोकांना सल्ला | शिवसेनेसह देशभरातून संताप
मुंबई, ०३ ऑगस्ट | राज्यातील लोकांनी चिकन, मटन आणि माशांपेक्षा जास्त गोमांस खाण्याचा सल्ला मेघालयातील भाजप नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सबनोर शुलाई यांनी दिला आहे. लोकांनी कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात गोमांस खावे. आपला देशात लोकशाही असल्याने प्रत्येकजण जे पाहिजे ते खाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले. ते शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप नेते सबनोर शुलाई यांना गेल्याच आठवड्यात राज्याच्या पशुसंर्वधन आणि पशुवैद्यकीय खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात भाजप गोहत्या बंदी कायदा आणणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. विशेष म्हणजे शुलाई यांनी संबंधित विभागाची जबाबदारी स्वीकारताच हे मोठे विधान केले आहे.
राज्यांमधील वाद पोलिसांच्या मदतीने सोडवावा:
मेघालय आणि आसाम दरम्यान गेल्या काही दिवसापासून सीमा विवाद सुरु आहे. राज्याच्या सीमेसाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी तेथील लोकांनी पोलिसांची मदत घ्यावी असे ते यावेळी म्हणाले. जर आसामच्या लोकांनी सीमेजवळ राहणाऱ्या आमच्या लोकांना त्रास दिला तर आम्ही त्यांच्याशी चहावर चर्चा करत राहणार नाही, तर उचित कारवाई केली जाईल असे शुलाई यांनी सांगितले.
शिवसेनेकडून संताप व्यक्त:
दरम्यान, भाजप मंत्र्याच्या गोमांस खाण्याच्या मुद्द्यावरून देशभरातून भाजपच्या हिंदुत्वावर सडकून टीका सुरु झाली आहे. या विधानावरून शिवसेनेनं भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. “भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या मोदी पर्वात गोवंश हत्येचा विषय बासनात गुंडाळला गेला असून गोमातांचा दर्जा खाली गेला आहे”, असं म्हणत शिवसेनेनं झुंडबळी ठरलेल्यांची भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.
ज्या सरकारातला मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतोय ते सरकार पक्के देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी असल्याचे सांगत त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही झाली असती, पण भाजपाच्या मंत्र्याने गाई कापून खा असे बेताल विधान करूनही एकाही भाजपा प्रवक्त्याने गोमातेच्या सन्मानार्थ प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Meghalaya Government BJP minister Sanbor Shullai asks people to eat more beef than chicken mutton or fish news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती