16 April 2025 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

माइक पॉम्पियो भारतात | चीनच्या मुद्यावरून भारत-अमेरिकेदरम्यान महत्वाची बैठक

Mike Pompeo, US Secretary of State, arrives in India

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo, Secretary of State) पत्नीसह दिल्लीत दाखल झाले. भारत आणि अमेरिका २+२ या मंत्रीस्तरिय बैठकीच्या निमित्ताने २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्परही (Mark Esper, Defense Secretary) सहभागी होतील. भारतासोबतच्या चर्चेनंतर पॉम्पिओ श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचाही दौरा करणार आहेत.

याआधी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सुरू असलेली लढाई थांबली आहे, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी ट्वीट करुन दिली. दोन्ही देशांनी युद्धबंदीला संमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यातील सहकार्य वाढावे यासाठी भारत, श्रीलंका, मालदीव आणि इंडोनेशिया या देशांचा दौरा करत असल्याचे पॉम्पिओ यांनी ट्वीट करुन सांगितले. अमेरिकेत यंदा ३ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेनुसार मतदानातून लोकप्रतिनिधींची निवड होईल. हे प्रतिनिधी अमेरिकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतील. ही निवडणूक होण्याआधी पॉम्पिओ शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा करत आहेत.

दिल्लीत एस्पर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पॉम्पिओ भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar, External Affairs Minister) यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री काही मुद्यांवर संयुक्तपणेही चर्चा करण्याची शक्यता आहे. या चर्चेत मलबार युद्धाभ्यासाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री मंगळवारी नवी दिल्ली येथे वॉर मेमोरियलचा दौरा करतील आणि श्रद्धांजली देतील. यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये 2+2 बैठक सुरू होईल. या बैठकीत बेसिक एक्सचेंज तसेच कॉर्पोरेशन अॅग्रीमेंटवर शिक्कामोर्तब होऊ शकते. यानंतर अमेरिका भारताबरोबर अनेक महत्वपूर्ण गोष्टी शेअर करेल. यात सॅटेलाईटसह इतर सैनिकी माहितीचाही समावेश आहे. याशिवाय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तथा सैन्य विषयक वातावरणावरही चर्चा होईल.

हे दोन्ही नेते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत. यानंतर भारत-अमेरिकेकडून शेअर करण्यात आलेली माहितीही जाहीर केली जाईल. चीनबरोबर सुरू असलेल्या तणावात अमेरिका अनेक वेळा भारताबरोबर उभा राहिला आहे. तसेच चीनवर परिस्थिती बिघडवण्याचाही आरोप केला आहे.

 

News English Summary: US Secretary of State Mike Pompeo and defence secretary Mark Esper arrived in New Delhi on Monday afternoon for the 2+2 dialogue. The talks will be held on Tuesday. The holding of the third US-India 2+2 Ministerial Dialogue demonstrates the high-level commitment the two countries provide to shared diplomatic and security objectives, US State Department had said on Sunday.

News English Title: Mike Pompeo US Secretary of State arrives in India for meeting News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या