मोदीजी सर्व जवान हे भारतीय आहेत, लष्करात प्रादेशिकवाद घुसवू नका - जितेंद्र आव्हाड
मुंबई, २२ जून: ६ जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी १५ जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली होती.
बिहार रेजिमेंट आणि पंजाब रेजिमेंटच्या जवानांनी चिनी सैन्यावर हल्ला चढवला. रात्री अंधार असल्यानं फारसा अंदाज येत नव्हता. मात्र या परिस्थितीतही शीख सैनिकांनी योग्य अंदाज घेत चिनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. त्या अधिकाऱ्याला थेट उचलून आणण्यात आलं. एबीपी न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं होतं. पंजाब रेजिमेंटचे जवान पराक्रम गाजवत असताना बिहार रेजिमेंटचे जवानही त्यांच्या बरोबरीनं लढत होते. बिहार रेजिमेंटच्या जवानांनी अनेक चिनी जवानांच्या माना मोडल्या. बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवान चिनी सैन्यावर अक्षरश: तुटून पडले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन करताना गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या बिहार रेजिमेंटचा उल्लेख करत बिहारमधील नागरिकांनी त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगावा असं आवाहन केलं होतं. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “मराठा रेजिमेंटमधील सर्व जवान मराठा नाहीत. गोरखा रायफल्समधील सर्व जवान गोरखा नाहीत. मद्रास रेजिमेंटमधील सर्व जवान तामिळ नाहीत. त्याचप्रमाणे बिहार रेजिमेंटमधील सर्व जवान फक्त बिहारमधील नाहीत. लष्करात जात, धर्म आणि प्रादेशिकवाद घुसवू नका. मोदीजी सर्व जवान हे भारतीय आहेत”, अशा शब्दात आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
All soldiers in #MarathaRegiment are not #Marathas
Soldiers in #GorkhaRifles are not #Gorkhas
Soldiers in #MadrasRegiment are not #Tamil
–#BiharRegiment does not have only #Bihari soldiers
Don’t inject Caste,Relgion and regionalism in military ..#Modi all soldiers r #Indians— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 21, 2020
News English Summary: Prime Minister Narendra Modi, while inaugurating the Garib Kalyan Rozgar Abhiyan, had mentioned the struggle in Galwan Valley. Referring to the Bihar Regiment formed by the then Prime Minister, he had appealed to the people of Bihar to be proud of their prowess. Jitendra Awhad has criticized it.
News English Title: Minister Jitendra Awhad To PM Narendra Modi do not Inject Regionalism In Military forces News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN