28 December 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Post Office Scheme | महिना खर्चाचं टेन्शन मिटेल, पोस्टाची ही योजना प्रत्येक महिन्याला 9250 रुपये देईल, फायद्या घ्या SIP Mutual Fund | पैशाचा मॅजिक फॉर्म्युला, 21 व्या वर्षापर्यंत तुमचा मुलगा देखील होईल कोटींचा मालक; फक्त हा फॉर्म्युला फॉलो करा Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 30% परतावा दिला, खरेदीला तुफान गर्दी - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | बँक FD 10 वर्षात जेवढं व्याज देईल तेवढा परतावा दर वर्षी देणाऱ्या फंडाची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा Penny Stocks | 48 पैशाच्या पेनी शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले, दणादण परतावा मिळतोय - Penny Stocks 2024 Horoscope Today | 'या' राशींसाठी नवीन वर्ष अत्यंत खास असणार आहे तर, अनेकांना वैवाहिक सुख लाभणार, पहा तुमचे राशी भविष्य
x

अमेरिकन निवडणुकीत 'अब की बार ट्रम्प सरकार'चं आवाहन | इतरांनी इथे समर्थन देताच जळफळाट?

Ministry of External Affairs, Modi Govt, International celebrity, Rihaana

नवी दिल्ल्ली, ०३ फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

त्याचबरोबर या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट बरंच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे.

मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने, भारतीय संसदेने पूर्ण चर्चा करुन कृषी क्षेत्राशी संबंधित सुधारणावादी कायदे संमत केले आहेत असं स्पष्ट केलं आहे. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. “खळबळ निर्माण करणारे सोशल मीडिया हॅशटॅग आणि वक्तव्यांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याची पद्धत, खास करुन जेव्हा ही पद्धत लोकप्रिय व्यक्तींकडून वापरली जाते तेव्हा ती योग्य नसते तसेच ती बेजबदारपणा दाखवते,” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

इतर देशातील नागरिक भारतातील शेतकरी आंदोलनाला समर्थन देताच मोदी सरकारचा जळफळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक लोकशाही असलेल्या प्रत्येक देशाच्या बाबतीतही तेच नियम लागू होतात. मात्र अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारताच्या पंतप्रधांनाही थेट अमेरिकेत मतदारांना “‘अब की बार ट्रम्प सरकार’चं आवाहन” केल्याचं जगजाहीर आहे. त्यासाठी निवडणुकीपूर्वी अमेरिकेत आणि भारतात दोन भव्य इव्हेंटचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. त्यामुळे मोदी सरकार स्वतःला पोषक अशा भूमिका लोकशाहीच्या हस्तक्षेपाबद्दल घेताना दिसत आहे.

 

News English Summary: But now the Ministry of External Affairs has issued a statement in this regard. In it, the Ministry of External Affairs has clarified that the Indian Parliament has passed reformist laws related to the agricultural sector after full discussion. A statement issued by the Ministry of External Affairs on Wednesday responded to the criticism made by the celebrities. “The method of attracting people through sensational social media hashtags and statements, especially when used by popular people, is inappropriate and irresponsible,” the foreign ministry said in a statement.

News English Title: Ministry of External Affairs has issued a statement after international celebrity support of farmers protest news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x