15 November 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

राज ठाकरेंच पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या ट्विट मध्ये महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे.

१ मे म्हणजे आज महाराष्ट्र दिनी सकाळी ६ वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी ट्विट करत हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे. समाज माध्यमांवर राज ठाकरे यांचा प्रवेश झाल्याने मनसेचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा कार्यरत झाला आहे. राज ठाकरे यांनी पहिल्यांदा फेसबुक वर इंट्री केली होती.

काही महिन्यापूर्वी त्यांनी फेसबुक पेजवर प्रवेश करून अल्पावधीतच लाखो चाहत्यांना आकर्षित केलं होत. कार्यकर्ते तसेच सामान्य मराठी माणसा बरोबर संपर्कात राहणं तसेच स्वतःचे विचार मांडणं त्यांच्यासाठी सोपं झालं आहे. याच फेसबुक पेजच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेमकं बोट ठेऊन अनेक व्यंगचित्र रेखाटली आणि सामान्यांना पटली सुध्दा आहेत.

ट्विटर मुळात मायक्रो सोशल मीडिया म्हणून प्रसिद्ध आहे. कारण इथे शब्दांच्या मर्यादेमुळे स्पष्टीकरणाला जास्त वाव नसतो, त्यामुळे बरेच जण इथे येणं टाळतात किंव्हा असेल अकाउंट तरी वापरात नसतं. परंतु राज ठाकरे स्वतः ट्विटरवर अधिकृतपणे आल्याने अनेक मनसे कार्यकर्त्यांची जुनी ट्विटर अकाउंट्स कार्यरत होऊ शकतात.

टि्वटरवर राज ठाकरे यांच्या नावाने @RajThackeray हे अकाऊंट सुरू करण्यात आले. त्याआधी मनसे अधिकृत या नावाने मनसेचं टि्वटर अकाऊंट आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x