23 February 2025 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मनसे हिंदुत्वाचा झेंडा खांदयावर घेऊन देशभर विस्तार करण्यासाठी तरुणांची राज ठाकरेंना विनंती

HIndutva, MNS Party, Tulsi Joshi, Raj Thackeray, Amit Thackeray

जयपूर: २०२४ मधील निवडणुका या हिंदुत्वाच्या मुद्यावर लढल्या जातील अशी सध्याची परिस्थिती सांगते. दरम्यान, मनसेने देखील भगव्याला स्वीकारून नवे बदल केल्याने त्यांना सध्या चांगले येण्याची शक्यता आहे. शिवसेना त्यांच्या कट्टर आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने शिवसेनेचा मूळ मतदार प्रचंड नाराज आहे. त्यात अल्पसंख्यांक धार्जिणे निर्णय घेण्यास त्यांना महाविकास आघाडी भाग पाडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

परिणामी, राज ठाकरे यांच्याकडे केवळ महाराष्ट्रातील हिंदू विचारांचे लोकच नव्हे तर देशभरातील अमराठी युवकांचा देखील ओघ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याची सुरुवात राजस्थान मधून झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंचे आणि मराठी तसेच हिंदुत्वाचे कट्टर समर्थक असलेल्या तुलसी जोशी यांच्यामार्फत राजस्थानातील कट्टर हिंदुत्ववादी तरुणांनी मनसेच्या भगव्या झेंड्याची थेट राजस्थानमध्ये विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यासंदर्भात हे तरुण समाज माध्यमांवर तशी व्हिडिओ’मार्फत जाहीर इच्छा व्यक्त करून राज ठाकरेंना विनंती करत असल्याचं दिसत. त्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर असे तरुण आणि हिंदुत्ववादी संघटना पुढे येईन मनसेत सामील होतील अशी शक्यता आहे.

तत्पूर्वी, मुंबई पुण्यात पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात उघडपणे बॅनरबाजी होताना दिसत होती. मनसेच्या भगव्याने कट्टर भूमिका घेतली असली तरी युतीच्या काळात उघड भूमिका मांडणारी शिवसेना महाविकास आघाडीमुळे अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा अभूतपूर्व असेल अशी माध्यमांमध्ये देखील चर्चा असून, त्यानंतर राज ठाकरे यांची हिंदुत्वाबद्दलची भूमिका देशभर बळकट होऊन मनसेबद्दल भविष्यातील वेगळी विचारधारणा निर्माण होण्याची अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

दुसऱ्या बाजूला, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (CAA) आणि NRC’वरून कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांचा अधिक वेळ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुखावणार नाही यातच खर्ची होतं आहे. परिणामी त्यांच्यापासून हिंदू मतदार नाराज झाला असून, ते भविष्यात देखील काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जातील असंच चित्र झाल्याने जुना मतदार देखील मनसेकडे वर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.

 

Web Title:  MNS Party ready to make expansion outside Maharashtra with Hindutva Agenda.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x