18 November 2024 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

मोदींनी बलवान असल्याची स्वतःची खोटी प्रतिमा तयार केली - राहुल गांधी

Modi fake strongman image, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २० जुलै : भारत-चीनच्या सीमेवर तणाव सूरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मोदींनी सत्तेत येण्यासाठी बलवान असल्याची खोटी प्रतिमा तयार केली. ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र हीच बाब भारतासाठी कुमकुवतपणा ठरत आहे’, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.

या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी म्हणाले की, हा सर्वसाधारण सीमावाद नाही. माझ्यासाठी चिंतेची बाब ही आहे की चीन आपल्या हद्दीत येऊन बसला आहे. रणनीतीशिवाय चीन कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यांच्या डोक्यात नकाशा तयार झालेला आहे. ते आता स्वतःच्या मनाप्रमाणे त्याला आकार देत आहेत. जे त्यांना हवे आहे तेच ते करत आहेत. त्यामध्येच ग्वादर, बेल्ट एंड रोडचा समावेश आहे. हे एकप्रकारे ग्रहाची पुनर्रचनाच आहे. हा वाद भारताच्या पंतप्रधानांवर दबाव टाकण्यासाठी आहे. ते विशिष्ट प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते जे काही करत आहेत, तो आहे प्रतिमेवर हल्ला. त्यांना माहिती आहे की, प्रभावी राजकारणी राहणे ही नरेंद्र मोदी यांची मजबूरी आहे. त्यांना आपल्या ५६ इंची प्रतिमेला कायम ठेवावे लागणार आहे आणि हाच मूळ विचार आहे, ज्यावर चीन हल्ला करत असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, चीन जे काही करतो ते त्यांच्या रणनीतीचा भाग असते, जे समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले, ‘हा केवळ सर्वसाधारण सीमेवरील वाद नाही. चिनी लोक आमच्या भागात घुसले आहेत ही माझी चिंता आहे. चिनी विचार न करता कोणतीही गोष्ट करत नाहीत. त्यांच्या मनात जगाचा नकाशा तयार आहे आणि ते जगाला स्वत:नुसार आकार देत आहेत. ते जे काय करीत आहेत, ते योजनेनुसारच करत आहेत. ग्वादरदेखील त्याचा एक भाग आहे आणि बेल्ट अँड रोड प्रकल्पसुद्धा त्याचाच हिस्सा आहे. ते जगाची पुनर्रचना करीत आहे. म्हणून जेव्हा आपण चीनचा विचार करता ,तेव्हा आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मोदी सरकारला इशारा दिला की, पाकिस्तानसह मिळून चीन काश्मीरमध्ये गडबड करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘धोरणात्मक पातळीवर ते आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मग ते गलवान असो, डेमचाक असो किंवा पांगांग लेक असो. त्यांना आपली स्थिती मजबूत करायची आहे. ते आमच्या महामार्गामुळे अस्वस्थ आहेत आणि त्यांना आपला महामार्ग नष्ट करायचा आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर मिळून काहीतरी केले पाहिजे, असा त्यांचा व्यापक विचार आहेत.

 

News English Summary: Modi created a false image of being strong to come to power. This was their credit side. However, this is a weakness for India, “said Rahul Gandhi.

News English Title: Modi fake strongman image to come to power now it is Indias biggest weakness Rahul Gandhi News Latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x