22 February 2025 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

मोदी सरकारने वेळीच पावलं न उचलल्याने १ लाख मृत्यू | २-३ वेळा चुकांची पुनरावृत्ती - अमेरिकन प्राध्यापिका

Corona Pandemic

नवी दिल्ली, २९ जुलै | देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 43 हजार 159 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 38 हजार 525 लोक उपचार घेत बरे झाले तर 640 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याचबरोबर सक्रिय प्रकरणांत ही वाढ होत आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 97 हजार 330 आहे. बुधवारी या आकडेवारीत 3 हजार 987 ने वाढ झाली आहे. हा आकडा गेल्या 77 दिवसातील सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

देशात केरळमध्ये सर्वात जास्त रुग्ण:
देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत आहे. परंतु, केरळ राज्यात गेल्या 24 तासात 22 हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. काल 27 जुलै रोजी 22 हजार 129 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे देशात केरळ एकमेव असे राज्य आहे ज्यामध्ये दीड लाख लोकांवर उपचार सुरु आहे. कोरोनाच्या येणाऱ्या नवीन प्रकरणांमुळे चिंतेत वाढ होत आहे.

दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत जर मोदी सरकारने वेळीच योग्य ती पावलं उचलली असती तर देशात १३ कोटी रुग्णांना करोनापासून वाचवता आले असते आणि १ लाख मृत्यू टाळता आले असते असे मत मिशिगन विद्यापीठातील महामारी विज्ञान आणि जागतिक सार्वजनिक आरोग्य या विषयांच्या प्राध्यापिका भ्रमर मुखर्जी यांनी मांडले आहे.

भारतातील दुसर्‍या लाटेच्या वेळी झालेल्या विध्वंससाठी मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते असे त्यांनी म्हटलेलं म्हणणार नाही, पण दोन किंवा तीन वेळा झालेल्या चुकांसाठी आम्ही सरकारला जबाबदारी आणि दोषातून मुक्त करू शकत नाही असे मुखर्जी यांनी मान्य केले आहे. द वायरला दिलेल्या मुलाखतीत मुखर्जी त्यांनी दुसर्‍या लाटेवरील त्यांच्या अलीकडील अभ्यासामधील आश्चर्यकारक पण त्रासदायक आणि निराश करणारा निष्कर्ष सांगितला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Modi Government delay in taken steps in Second wave 1 Lakh deaths could have been avoided opinion of an American Professor Bhramar Mukherjee news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x