22 January 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

मोदी सरकारच्या अहंकाराने ६० पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला | हट्ट सोडा

Modi governments, apathy and arrogance , 60 farmers Dead, Rahul Gandhi

नवी दिल्ली, ५ जानेवारी: केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारचे औदासीन्य आणि अहंकारामुळे ६० पेक्षा अधिक शेतकर्‍यांचा जीव घेतला आहे. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी भारत सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशी क्रूरता, केवळ विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा. असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तसेच, या ट्विटबरोबर मोदी सरकार हट्ट सोडा, हा हॅशटॅग देखील जोडण्यात आलेला आहे.

दरम्यान, शेतकरी संघटना आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी बैठक पार पडली होती. दिल्लीतील विज्ञान भवनात शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही बैठक सुमारे चार तास चालली होती. पण ही बैठकही निष्फळ ठरली. शेतकरी संघटना तिन्ही कायदे रद्द करणे आणि एमएसपीच्या हमीवर ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने एक तिन्ही कायद्यांमधील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चेची तयारी दर्शवली आहे. आता येत्या शुक्रवारी ८ जानेवारीला दुपारी दोन वाजता पुढील बैठक होणार आहे.

 

News English Summary: The farmers’ agitation on the Delhi border to repeal the new agriculture laws of the central government has been going on for more than a month now. So far 60 farmers have died in this agitation. However, the agitation is still going on as no solution has been reached yet. Against this backdrop, Congress leader Rahul Gandhi has once again criticised the Modi government.

News English Title: Modi governments apathy and arrogance have claimed lives of over 60 farmers said Rahul Gandhi news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x