21 November 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
x

हुशार व्यवस्थापन | आधी भारतातल्या लसी जगभर पाठवल्या | आता जगभरातल्या लसी भारतात

Modi govt, Foreign corona vaccines

नवी दिल्ली, १३ एप्रिल: देशातील लसीचा तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जगभरातील ज्या लसीचा अत्यावश्यक वापर केला जात आहे. त्या सर्व लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणार आहे. यामध्ये यूएस फूड अ‍ॅन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके, पीएमडीए, एमएचआरए आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केलेल्या सर्व लसींचा समावेश आहे. यापुर्वी देशात रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) आणि भारतातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. आपापर्यंत भारतातील लसीकरण अभियानातील ही तिसरी लस आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने सांगितले की, भारत हा जगातील 60 वा असा देश आहे ज्याने ‘स्पुतनिक-व्ही’ लसीला वापरासाठी मंजुरी दिली आहे. लशीला मंजुरी देणाऱ्यांत यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, यूरोपियन मेडिसिन एजन्सी, यूकेएमएचआरए, पीएमडीए जपान आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा समावेश आहे.

देशातील लशींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेतला. ज्या लशींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेने मान्यता दिले आहे. त्या सर्व लशींना भारताने देखील मंजुरी दिली आहे. सरकारने आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे. त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि WHO शी संबंधित आहेत.

त्या देशांनी ज्याप्रमाणे पेटंट हक्क करारावर देऊन लस त्याच देशांना निर्मितीसाठी दिली आहेत, तसं भारतात न करता इथल्या तयार असलेल्या लस मोदी सरकारने परदेशात पाठवल्या होत्या आणि तीच चूक आज नडते असल्याचं म्हटलं जातंय. अन्यथा आज देशातील एकूण लसीकरणाचा आकडा हा ६ ते ७ कोटीने अधिक असला असला असता हे आकडेवारीतून स्पष्ट होतंय.

 

News English Summary: The central government on Tuesday took a major decision to reduce the shortage of vaccines in the country. Accordingly, the vaccine that is being used essentially around the world. All those vaccines will be approved for emergency use in India.

News English Title: Modi govt fast track emergency approvals for foreign corona vaccines news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x